Posts

हायपर युरेसिमिया -- गाऊट

Image
हायपर युरेसिमिया -- गाऊट   (As Dangerous as Diabetes)      हायपर युरेसिमिया --गाऊट:- यास राजे लोकांचा आजार(so called Disease of Kings) असेही म्हणतात.  हा एक प्रकारचा संधिवात (Inflamatory Arthritis)आहे. गेल्या दहा वर्षात याचे प्रमाण सुद्धा खूप वाढले आहे. प्रत्येक ४०  व्यक्तीं पाठीमागे एका व्यक्तीस हा आजार होत  आहे. २० ते  ४० वयोगटात ह्याचे अधिक प्रमाण दिसून येते. अर्थात प्रमाण वाढण्यामागचे कारण आधुनिक जीवनशैली--अयोग्य आहार--व्यायामाचा अभाव हेच प्रमुख कारण आहे. डायबेटीस (मधुमेह) ,एच.आय.व्ही(H.I.V) ,कॅन्सर याबद्दल आपणास बरीच  माहिती आहे. बरीच जनजार्गृती झालेली आहे.पण हायपर युरेसिमिया देखील घातक ठरू शकतो. याची मात्र फार कमी लोकांना माहिती आहे.  हायपर युरेसिमिया --गाऊट असणाऱ्या व्यक्तीस  १) Type-II डायबेटीस होण्याची सहापट जास्त शक्यता असते.(6 Fold risk of DM2 ) २) सातपट जास्त उच्च रक्तदाबाचा (Hypertension) त्रास होण्याची शक्यता असते.(7 fold risk of Hypertension) ५८.१ % लोकांना गाऊट सोबत इतर आजार होण्याची (Co m...

'डी ' करव्हान्स सिंड्रोम (HAZARDS OF TEXT TYPING)

Image
'डी ' करव्हान्स सिंड्रोम (HAZARDS OF TEXT TYPING) 'डी ' करव्हान्स किंवा कार्पल टनल सिंड्रोम हे काही नवीन आजार नाहीत. मनगटाचा व अंगठ्याचा अतिवापर करणाऱ्यांमध्ये असे आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. संगणक आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे हा त्रास असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत बरीच वाढ झालेली आहे. वयोमर्यादा पूर्वी ३० ते ५० वर्ष होती. लहान वयातच संगणक आणि मोबाईलचा अतिवापर अयोग्य पद्धतीने केल्यामुळे वयोमर्यादा १४ ते ५० वर्षे अशी झाली आहे.  'डी ' करव्हान्स  सिंड्रोम पुरुषांपेक्षा महिलांमध्ये १० पट जास्त आढळून येतो. IT/BPO मध्ये काम करणाऱ्या तरुण पिढीस ८ ते १० तास संगणकासमोर बसून काम करावे लागते. शासकीय,निमशासकीय कर्मचाऱ्यांचीही तिच अवस्था आहे.सतत मोबाईलवर गेम खेळणारी लहान मुले,शाळा-कॉलेज,युवक -युवतींमध्ये  होणार मोबाईलचा अतिवापर,सतत SMS/TEXT TYPING केल्यामुळे मनगट व अंगठ्यावर निर्माण होणारा दाब या त्रासाचे मुख्य कारण आहे.घरकाम करणाऱ्या महिला,खेळाडू,मनगटावर ताण देऊन काम करणारे कामगार (सुतार,प्लंबर,इलेक्ट्रीशियन,मोटार मेकॅनिक)अतिलिखान काम करणारे लिपिक यां...

कार्पल टनल सिंड्रोम (Hazard of Text Typing)

Image
कार्पल टनल सिंड्रोम (Hazard of Text Typing) लाईफ स्टाईल डिसऑर्डर्स किंवा आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या आजारापैकी  कार्पल टनल सिंड्रोम हा अतिशय वेगाने वाढत चाललेला आजार आहे. वयोमर्यादा पूर्वी ३० ते ४० वर्ष वयोगट होता. आज तो १५ ते ४० वयोगटापर्यंत आला आहे. संगणक आणि मोबाईल फोनचा वापर हे त्या मागचे प्रमुख कारण आहे.  माहिती तंत्रज्ञान युगामुळे भरपुर पैसा आणि रोजगार निर्माण झाले आहेत. IT/BPO मध्ये पैसा चांगला मिळत असला तरी तरुण पिढीस मात्र तो कमवण्यासाठी ८ ते १२ तास सलग संगणकासमोर बसून दिवस -रात्री काम करावे लागते. सतत टायपिंग केल्यामुळे ,सतत मोबाईलचा वापर,SMS,Text टायपिंग केल्यामुळे अंगठा व मनगटावर प्रचंड दबाव (प्रेशर) निर्माण होतो. त्याचा परिणाम हातामध्ये / बोटांमध्ये अचानक बधिरपणा येणे, मुंग्या येणे,कळ मारणे,भडका मारणे, पिन टोचल्यासारखे होणे,ताकद कमी होणे असा होतो. कॉम्प्युटर किबोर्ड टायपिंग ,मोबाईल टेक्स्ट टायपिंगमुळे असा त्रास असणारे एका महिन्यात किमान तीन ते चार रुग्ण तक्रार घेऊन येतात. महिलांचे प्रमाण अधिक आहे ,कारण त्यांचा  कार्पल टनल पुरुषांच्या...