हायपर युरेसिमिया -- गाऊट
हायपर युरेसिमिया --गाऊट:- यास राजे लोकांचा आजार(so called Disease of Kings) असेही म्हणतात.
हा एक प्रकारचा संधिवात (Inflamatory Arthritis)आहे. गेल्या दहा वर्षात याचे प्रमाण सुद्धा खूप वाढले आहे. प्रत्येक ४० व्यक्तीं पाठीमागे एका व्यक्तीस हा आजार होत आहे. २० ते ४० वयोगटात ह्याचे अधिक प्रमाण दिसून येते. अर्थात प्रमाण वाढण्यामागचे कारण आधुनिक जीवनशैली--अयोग्य आहार--व्यायामाचा अभाव हेच प्रमुख कारण आहे. डायबेटीस (मधुमेह) ,एच.आय.व्ही(H.I.V) ,कॅन्सर याबद्दल आपणास बरीच माहिती आहे. बरीच जनजार्गृती झालेली आहे.पण हायपर युरेसिमिया देखील घातक ठरू शकतो. याची मात्र फार कमी लोकांना माहिती आहे.
हायपर युरेसिमिया --गाऊट असणाऱ्या व्यक्तीस
१) Type-II डायबेटीस होण्याची सहापट जास्त शक्यता असते.(6 Fold risk of DM2 )
२) सातपट जास्त उच्च रक्तदाबाचा (Hypertension) त्रास होण्याची शक्यता असते.(7 fold risk of Hypertension) ५८.१ % लोकांना गाऊट सोबत इतर आजार होण्याची (Co morbidities) शक्यता असते.
३)कमी वयात सांधे झिजण्याचे (Osteoarthritis)प्रमाण खूप अधिक आहे.
४)हायपर युरेसिमिया रुग्णात टेन्डीनोपॅथी अथवा टेन्डीनायटीस चे प्रमाण दोन पट जास्त दिसून येते.
५)मुत्रपिंडात खडे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. (Renal Calculi)
जर्नल ऑफ क्लिनिकल हायपरटेन्शन मधील नोंदीनुसार (Journal of Clinical Hypertension)
रक्तातील युरिक ऍसिड (Serum Uric acid) वाढल्यास
१)सकाळच्या वेळी रक्तदाब वाढण्याची शक्यता वाढते. यास MBPS असे म्हणतात. (MBPS-Morning Blood Pressure Surge)
२)हृदय विकार होण्याची शक्यताही वाढते. यास MACE म्हणतात.(MACE--Major Cardiovascular and cardiac event including M.I and Coronary revascularization)(M.I--Myocardial In Fraction)हृदयविकाराचा झटका
अमेरिकन हार्ट असोसिएशन(American Heart Association) च्या नोंदी नुसार हृदयविकारामुळे होणाऱ्या १३% मृत्यूचे अयोग्य आहार(Poor Diet) हेच कारण आहे.
अमेरिकन हार्ट असोसिएशन(American Heart Association) च्या नोंदी नुसार हृदयविकारामुळे होणाऱ्या १३% मृत्यूचे अयोग्य आहार(Poor Diet) हेच कारण आहे.
वरील नोंदीचा विचार करता हायपर युरिसिमिया--गाऊट वर नियंत्रण मिळवण्यासाठी रक्तातील युरिक ऍसिड चे प्रमाण कमी करण्यासाठी आहारातील प्युरीन (Purine) चे प्रमाण कमी करून भरपूर पाणी व चालण्याचा व्यायाम करणे गरजेचे आहे.
हायपर युरेसिमिया --गाऊट म्हणजे काय ? आणि प्युरीन म्हणजे काय ? हे आता आपण समजावून घेऊ.
गाऊट या आजारास राजे लोकांचा आजार म्हणण्यापाठीमागे एक गंमतीशीर कारण आहे.
किंग हेनरी ८(UK King Henry VIII)या आजाराने ग्रस्त होता. कारण किंग हेनरी भरपूर दारू प्यायचा आणि खूप खायचा. अतिशय निवांत जीवनशैली--व्यायाम न करता उपभोगत असे.
हायपर युरेसिमिया--गाऊट हा एक संधिवाताचा(Inflamatory Arthritis)प्रकार आहे. ज्यात प्युरीनच्या चयापचय प्रक्रीयेत बिघाड झाल्यामुळे(Metabolic disorder of purine) शरीरातील युरिक ऍसिडचे (युरेट) प्रमाण वाढते.
ते युरेट क्रिस्टल स्वरूपात सांध्यात(Joint)आणि शरीरातील इतर भागात उदा. रक्तवाहिन्या,मुत्रपिंड (किडनी) मांसपेशी मध्ये जमा होते.
प्युरीन हा रासायनिक घटक नैसर्गिकरित्या शरीरात आणि काही अन्न पदार्थांत आणि दारूत (alcohol) असते. त्याचे विघटन झाल्यानंतर युरिक ऍसिड (युरेट) तयार होते. युरिक ऍसिड हे हानिकारक नसते. उलट अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करते. (युरिक ऍसिड हा पाण्यात विरघळणारा रासायनिक घटक आहे.)
युरिक ऍसिड शरीरात विरघळून लघवीद्वारे (७० %) आणि विष्ठे द्वारे (३० %) शरीरातून बाहेर पडते. पण युरिक ऍसिड चे प्रमाण वाढल्यास ते शरीरात साठून राहून हानिकारक बनते.
ऍडीनीन (Adenine),ग्वानिन(Guanine) आणि हायपोझानथीन (Hypoxanthine) असे तीन प्रकारचे प्युरीन आढळून येते.सर्वसाधारण सर्व प्रोटीनयुक्त आहारात प्युरीन असतेच.
गाऊटचे प्रकार
१) Type I गाऊट :-जन्मजात हायपर युरेसिमिया ज्यास आपण गाऊट म्हणतो.
२)Type II गाऊट :-जन्मजात नसणारा -हायपर युरेसिमिया उदा चुकीच्या जीवनशैलीमुळे अथवा अयोग्य आहार,व्यायामाचा अभाव आणि व्यसनामुळे होणारा

१) Type I गाऊट :-
२)Type II गाऊट अथवा हायपर युरेसिमिया :-
)Type II गाऊट जन्मजात नसतो. यात शरीरात युरिक ऍसिड वाढते पण ते लघवीतून किंवा विष्टेतून बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी अतिरिक्त युरिक ऍसिड शरीरात साठून राहते.
कारणे :-
जोखीम घटक(Risk Factor)
अ) आहार
दुष्परिणाम:-
वरील औषधे सिरम युरिक ऍसिड मोबीलाईज करुन विरघळवण्याचे काम करते. परिणामी उपचार सुरु केल्यानंतर सुरवातीस त्रास वाढल्यासारखे वाटते. नंतर हळूहळू तो कमी होतो. याची कल्पना रुग्णाला न दिल्यास तो उपचार अर्धवट सोडून देतो.
१.मटण :-खूप जास्त प्रमाणात प्युरीन असते सर्व प्रकारच्या न शिजवलेल्या मटणात 100mg/100qm पेक्षा जास्त प्युरीन असते.
२.चिकन लिव्हर,बकरे,डुक्कर,गाई,बैल यांचे लिव्हर,किडनी,हृदय,जीभ यात सुद्धा खूप जास्त प्रमाणात प्युरीन असते. (साधारणतः 200mg/100qm) हे खाणे टाळावे लागेल.
तसेच शिकार केलेल्या (Game Meat)प्राण्यांचे मटण खाणे टाळावे.
उदा.ससा,हरण,डुक्कर,तितर
३. मासे:-सर्वच समुद्री मासे सारखे नसतात.बऱ्याच समुद्री माशांत खूप जास्त प्रमाणात प्युरीन असते.
४. अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ (Egg & Milk Products)
अंडी आणि दुग्धजन्य पदार्थात प्युरीन चे प्रमाण खूप कमी असते अगदी १३mg/100g पेक्षा कमी खाव्यास काही हरकत नाही.
दुधातील प्रोटीन शरीरातील युरिक ऍसिड बाहेर काढण्यास मदत करते.
५. गडद निळ्या रंगाची आणि लाल रंगाची फळे उदा. चेरी,स्ट्रॉबेरी,ब्लूबेरी,मलबेरी यात खूप अँटीऑक्सिडेन्ट असते ही फळे शरीरातील युरिक ऍसिड कमी करण्यास मदत करतात.
६.शाकाहार
८)हायपर युरेसिमिया रुग्णांनी बिअर पिणे टाळावे.
युरिक ऍसिड शरीरात विरघळून किडनी मार्गे लघवीतून बाहेर पडत असते. पाणी कमी पिल्यास युरिक ऍसिड शरीरात साठून राहून मुतखडे(Rinal Calculi) होण्याचा धोका वाढतो.
मुतखड्याचा धोका टाळण्यासाठी दररोज किमान २. ते ३ लिटर पाणी प्यावे.
रोज ४५ मिनिटे ते एक तास चालण्याचा व्यायाम केल्यास आणि १० ते २० मिनिटे ताणाचा व्यायाम केल्यास सिरम युरिक ऍसिडचे प्रमाण चांगले कमी करता येते.
Type I गाऊट वर नियंत्रण आणि Type II गाऊट अर्थात आधुनिक आरामदायी जीवनशैली मुळे झालेला हायपर युरेसिमिया पुर्ण बरा करता येतो. आहाराची मजा लुटता येते. वजनही नियंत्रणात राहते.
सिरम युरिक ऍसिडच्या प्रमाणावर कडक नियंत्रण ठेवल्यास हायपर युरेसिमिया गाऊट मुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून संरक्षण मिळवणे सहज शक्य आहे.
- प्युरीनच्या चयापचय प्रक्रियेत जन्मजात दोष (Inborn error of purine metabolism)
- परिणामी शरीरातील युरिक ऍसिडच्या प्रमाणात वाढ
- सामान्यतः युरिक ऍसिड शरीरात नैसर्गिकरित्या विरघळून किडनीद्वारे लघवीतून आणि विष्टेद्वारे बाहेर पडते.
- पण जास्त प्रमाणात युरिक ऍसिड तयार झाल्यामुळे ते शरीरात साठून राहते.
२)Type II गाऊट अथवा हायपर युरेसिमिया :-
)Type II गाऊट जन्मजात नसतो. यात शरीरात युरिक ऍसिड वाढते पण ते लघवीतून किंवा विष्टेतून बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी अतिरिक्त युरिक ऍसिड शरीरात साठून राहते.
कारणे :-
- सतत बसून राहणे
- व्यायाम न करणे
- पाणी कमी पिणे
- नेहमी जास्त प्रोटीन / प्युरीनयुक्त आहार घेणे.
- अजिबात न चालणे / व्यायाम न करणे
- दारू पिणे
जोखीम घटक(Risk Factor)
अ) आहार
- मटण / मासे युक्त जेवण
- फ्रुक्टोजपासून बनवलेले गोड पेय पिणे. उदा :-फ्रुट ज्युस,कोला,सोडा
- दारू पिणे / बियर पिणे
आजकाल विकेंड (Weekend)सेलिब्रेशनच्या नावाखाली प्रत्येक शनिवार रविवार याचे प्रमाण खूप वाढले आहे.
आ) लठ्ठपणा :-लठ्ठ व्यक्तीच्या शरीरात युरिक ऍसिड निर्मिती जास्त होते. किडनीद्वारे युरिक ऍसिड बाहेर टाकण्याची प्रक्रिया मंदावते.
इ) डायबेटीस,रक्तदाब,हृदयविकार अथवा किडनीचे आजार असल्यास गाऊटची शक्यता वाढते.
ई)डाययुरेटिक्स(Diuretics)थियाझाइड(Thiazide), ऍस्पिरीन(Low Dose Aspirin) घेणाऱ्या रुग्णात सिरम युरिक ऍसिड वाढलेले असते.
उ)आई,वडील यांस गाऊट असल्यास मुलांनाही गाऊट होण्याची शक्यता जास्त असते.
ऊ) महिलांच्या तुलनेत पुरुषांना फार लवकर गाऊटचा त्रास होतो. वय साधारणतः ३० ते ५० वर्ष महिलांना मात्र हा त्रास मासिक पाळी थांबल्यानंतर जास्त प्रमाणात होतो.
दुष्परिणाम:-
१) सांधे लवकर झिजून खराब होणे.
२) युरीऍसिड टॉफी (Tophi)कातडीच्या खाली जमा होणे. उदा.पायात बोटांमध्ये,हातामध्ये,कोपरावर,डोमशिरेवर (Achilles)
३)मुतखड्याचा त्रास होणे.(Kidney Stone)
४) Type II डायबेटीस,रक्तदाब,हृदयविकाराचा त्रास होणे.
- पायाच्या अंगठ्यावर सांध्यावर सूज येणे(1 st Metacapo Phalangeal Joint),वेदना होणे,हालचाल मर्यादित होणे,सांधा सुजून लालसर होणे,स्पर्श केल्यावरसुद्धा दुखणे.
- अंगठया व्यतिरिक्त इतर सांधे उदा:- घोटा,गुडगा,कोपर,मनगट,बोटांचे सांधे सुद्धा दुखू किंवा सुजू शकतात.
- रात्री मटण / मासे,दारू पार्टी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी असा त्रास होणे अथवा अंगदुखी जास्त प्रमाणात जाणवते. टेन्डीनोपॅथीचे त्रास उदा :- खांदेदुखी,कोपरदुखी वाढते,बरगड्यातून वेदना जास्त प्रमाणात जाणवतात.
निदान:-
- X-Ray
- रक्त तपासणी :-1.सिरम युरिक ऍसिड(SUA)2.संधिवात तपासणी (Arthritic Profile)
- सांध्यातील पाणी तपासणी (Synovial Fluid Analysis)
उपचार :-
तीव्र स्वरूपाचा गाऊट असल्यास
१) सांध्यावरील सूज व कळा कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या (NSAID)घ्याव्यात.
२)सिरम युरिक ऍसिड (युरेट) कमी करणाऱ्या गोळ्या घ्याव्यात.(Zyloric/Feburic)
३) अति तीव्र स्वरूपाचा त्रास असल्यास कॉर्टिकोस्टिरॉईड (Corticosteroid)औषधाचा वापर करावा.
४)सोबत टाईप -२ डायबेटीस,उच्च रक्तदाब,हाय कोलेस्ट्रॉल असल्यास त्यावरही उपचार घ्यावेत.
५)बाधित रुग्णाने
- विश्रांती घ्यावी
- सूज आलेला भाग उंचावर ठेवावा. (Leg elevation)
- सांध्यास बर्फाने शेकावे. (Ice)
- मसाज करणे अथवा गरम पाण्याने शेकणे टाळावे.
- लेप,चुना,हळद गरम करुन लावणे इ.गावठी इलाज टाळावेत.
- भरपूर पाणी प्यावे.
६)सिरमयुक्त ऍसिड /युरेट क्रिस्टल कमी करणारी औषधे दीर्घ कालावधीसाठी डॉक्टरांच्या सल्याने घ्यावी लागतात. आलोप्युरिनॉल (Allopurinol) अतिशय सुरक्षित औषध आहे.
फेब्युकजोस्टॅट(Febuxostat)हे सुद्धा एक पर्यायी सुरक्षित औषध आहे.
वरील औषधे सिरम युरिक ऍसिड मोबीलाईज करुन विरघळवण्याचे काम करते. परिणामी उपचार सुरु केल्यानंतर सुरवातीस त्रास वाढल्यासारखे वाटते. नंतर हळूहळू तो कमी होतो. याची कल्पना रुग्णाला न दिल्यास तो उपचार अर्धवट सोडून देतो.
७) महिन्याला सिरम युरिक ऍसिड प्रमाण तपासून बघावे लागते. त्यानुसार उपचारात बदल करावा लागतो.
८)बरेचसे रुग्ण १२ ते १८ महिन्यांत बरे होतात -पण गाऊटची पुनरावृत्ती (Repeat Attack) रोखण्यासाठी आयुष्यभर उपचार घ्यावे लागतात.
प्रतिबंधात्मक इलाज:-
१) योग्य आहार
२) भरपूर पाणी पिणे
३)नियमित चालणे /व्यायाम करणे,वजन कमी करणे
१) योग्य आहार:-
हायपर युरेसिमिया गाऊट उपचारामध्ये आहारास फार महत्तव आहे. आहाराचे नियोजन करत असताना आहारातील प्युरीन बेसचे प्रमाण (ऍडीनीन,ग्वानिन आणि हायपोझानथीन) माहित असणे अत्यंत महत्वाचे आहे.
खाली दिलेला तक्ता समजावून घेतल्यास काम अधिक सोपे होईल.

- खूप जास्त प्रमाणात प्युरीन युक्त आहार घेतल्यास युरिक ऍसिडचे प्रमाण पाच पटीने वाढते.
- शाकाहारी जेवणातील प्युरीनपेक्षा मांसाहारी जेवणातील प्युरीन जादा घातक ठरते.
१.मटण :-खूप जास्त प्रमाणात प्युरीन असते सर्व प्रकारच्या न शिजवलेल्या मटणात 100mg/100qm पेक्षा जास्त प्युरीन असते.
२.चिकन लिव्हर,बकरे,डुक्कर,गाई,बैल यांचे लिव्हर,किडनी,हृदय,जीभ यात सुद्धा खूप जास्त प्रमाणात प्युरीन असते. (साधारणतः 200mg/100qm) हे खाणे टाळावे लागेल.
तसेच शिकार केलेल्या (Game Meat)प्राण्यांचे मटण खाणे टाळावे.
उदा.ससा,हरण,डुक्कर,तितर
३. मासे:-सर्वच समुद्री मासे सारखे नसतात.बऱ्याच समुद्री माशांत खूप जास्त प्रमाणात प्युरीन असते.
- माशांच्या मटणात हायपोझानथीन (Hypoxanthine) चे प्रमाण ५०% पेक्षा जास्त असते.
- ऑईली फिश काही प्रमाणात खाऊ शकता.
- खेकडा (Shell Fish),कोळंबी(Shrimp),वाळवलेला मासा उदा. सुकट,बोंबील यात खूप जास्त प्रमाणात प्युरीन असते. म्हणून खाणे टाळावे.
४. अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ (Egg & Milk Products)
अंडी आणि दुग्धजन्य पदार्थात प्युरीन चे प्रमाण खूप कमी असते अगदी १३mg/100g पेक्षा कमी खाव्यास काही हरकत नाही.
दुधातील प्रोटीन शरीरातील युरिक ऍसिड बाहेर काढण्यास मदत करते.
५. गडद निळ्या रंगाची आणि लाल रंगाची फळे उदा. चेरी,स्ट्रॉबेरी,ब्लूबेरी,मलबेरी यात खूप अँटीऑक्सिडेन्ट असते ही फळे शरीरातील युरिक ऍसिड कमी करण्यास मदत करतात.
- केळी मध्ये सुद्धा प्युरीन चे प्रमाण खूपच कमी असते.
६.शाकाहार
- भाज्या(Vegetables) मध्ये खूप कमी प्रमाणात प्युरीन असते.
- ७०% भाज्या मध्ये 50mg/100gm पेक्षा कमी प्युरीन असते.
- भाज्या (Vegetables) खाणे योग्य आहे.
- पालक,ब्रोकोली यामुळे मात्र युरिक ऍसिड वाढते.
- धान्य,कडधान्य (Cerals),द्विदल धान्ये(Beans) यात खूप कमी प्रमाणात प्युरीन असते.खाण्यास योग्य आहे.
- सोया प्रॉडक्ट मधील सोयाबीन -दुध,हिरवी सोयाबीन खाण्यास योग्य
- पण गाऊट रुग्णाने सोया पनीर (टोफू) खाणे टाळावे.
८)हायपर युरेसिमिया रुग्णांनी बिअर पिणे टाळावे.
- बिअर पिण्यामुळे युरिक ऍसिड खूप जास्त प्रमाणात वाढते.
- बिअर मध्ये इथिनॉल असते आणि खूप जास्त ग्वानिन (Guanine)
- दोन मग बिअर पिणाऱ्यास २९% युरिक ऍसिड वाढण्याचा धोका, २ ते ४ मग पिणाऱ्यास ७५% पेक्षा जास्त प्रमाणात युरिक ऍसिड वाढण्याचा धोका असतो.
- लो माल्ट /लो प्युरीन बिअर (Low Malt and Low Purine Beer)चा युरिक ऍसिड प्रमाणावर काही परिणाम होत नाही.
- दारू दोन ड्रिंक प्रत्येक दिवशी पिणाऱ्या पुरुषास आणि एक ड्रिंक पिणाऱ्या महिलेस वारंवार गाऊटचा त्रास होण्याची ४१% शक्यता असते.
- जसजसे प्रमाण वाढत जाईल तसा तसा धोका अधिक वाढत जातो. सोबत जास्त प्युरीन असणार आहार घेतल्यास किंवा डाययुरेटिक घेत असल्यास तीव्र स्वरूपाचा गाऊट होण्याची शक्यता असते.
- इथिनॉल मुळे युरिक ऍसिडचे प्रमाण खूप जास्त वाढते इथिनॉल युरिक ऍसिडची निर्मिती वाढवते आणि शरीरातून युरिक ऍसिड बाहेर पडण्याची प्रक्रिया मंदावते.
- दारू सेवन मर्यादित ठेवणे अथवा बंद करणेच योग्य
युरिक ऍसिड शरीरात विरघळून किडनी मार्गे लघवीतून बाहेर पडत असते. पाणी कमी पिल्यास युरिक ऍसिड शरीरात साठून राहून मुतखडे(Rinal Calculi) होण्याचा धोका वाढतो.
मुतखड्याचा धोका टाळण्यासाठी दररोज किमान २. ते ३ लिटर पाणी प्यावे.
- मटण,मासे यातून येणारे प्रोटीन(Animal Protein) जास्त खाल्यामुळे,जास्त फ्रुक्टोस(Fructose) युक्त पेये (ड्रिंक्स) पिल्यामुळे उदा फ्रुटज्युस,कोला,सोडा,ऑपल पायी,मद इत्यादी पिल्यामुळे.
- कमी पाणी पिल्यामुळे मुतखड्याचा त्रास होण्याची शक्यता वाढते.
- भरपूर पाणी पिणे - फायबर युक्त शाकाहारी जेवण घेणे उत्तम.
रोज ४५ मिनिटे ते एक तास चालण्याचा व्यायाम केल्यास आणि १० ते २० मिनिटे ताणाचा व्यायाम केल्यास सिरम युरिक ऍसिडचे प्रमाण चांगले कमी करता येते.
Type I गाऊट वर नियंत्रण आणि Type II गाऊट अर्थात आधुनिक आरामदायी जीवनशैली मुळे झालेला हायपर युरेसिमिया पुर्ण बरा करता येतो. आहाराची मजा लुटता येते. वजनही नियंत्रणात राहते.
सिरम युरिक ऍसिडच्या प्रमाणावर कडक नियंत्रण ठेवल्यास हायपर युरेसिमिया गाऊट मुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून संरक्षण मिळवणे सहज शक्य आहे.
PREVENTION IS ALWAYS BETTER THAN CURE

सामान्य आणि गरीब लोकांसाठी उपयुक्तत आणि महत्त्वाचे आहे.
ReplyDeleteमस्त माहिती
छान माहिती दिली आहे, माझ्या खुप साऱ्या शंकांचे निरसन झाले.धन्यवाद
ReplyDelete