'डी ' करव्हान्स सिंड्रोम (HAZARDS OF TEXT TYPING)
'डी ' करव्हान्स सिंड्रोम (HAZARDS OF TEXT TYPING) 'डी ' करव्हान्स किंवा कार्पल टनल सिंड्रोम हे काही नवीन आजार नाहीत. मनगटाचा व अंगठ्याचा अतिवापर करणाऱ्यांमध्ये असे आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. संगणक आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे हा त्रास असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत बरीच वाढ झालेली आहे. वयोमर्यादा पूर्वी ३० ते ५० वर्ष होती. लहान वयातच संगणक आणि मोबाईलचा अतिवापर अयोग्य पद्धतीने केल्यामुळे वयोमर्यादा १४ ते ५० वर्षे अशी झाली आहे. 'डी ' करव्हान्स सिंड्रोम पुरुषांपेक्षा महिलांमध्ये १० पट जास्त आढळून येतो. IT/BPO मध्ये काम करणाऱ्या तरुण पिढीस ८ ते १० तास संगणकासमोर बसून काम करावे लागते. शासकीय,निमशासकीय कर्मचाऱ्यांचीही तिच अवस्था आहे.सतत मोबाईलवर गेम खेळणारी लहान मुले,शाळा-कॉलेज,युवक -युवतींमध्ये होणार मोबाईलचा अतिवापर,सतत SMS/TEXT TYPING केल्यामुळे मनगट व अंगठ्यावर निर्माण होणारा दाब या त्रासाचे मुख्य कारण आहे.घरकाम करणाऱ्या महिला,खेळाडू,मनगटावर ताण देऊन काम करणारे कामगार (सुतार,प्लंबर,इलेक्ट्रीशियन,मोटार मेकॅनिक)अतिलिखान काम करणारे लिपिक यां...