कोपरदुखी/टेनिस एल्बो/गोल्फर्स एल्बो

कोपरदुखी / टेनिस एल्बो / गोल्फर्स एल्बो

 ( Epicondylar Tendinopathies)

 टेनिस एल्बो म्हटलं की सचिन तेंडुलकर या क्रिकेटपटूची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. टेनिस एल्बोमुळे त्याच्या क्रिकेट कारकीर्दीस धोका निर्माण झाला होता. शेवटी उपचारासाठी त्याला परदेशी जावे लागले. बऱ्याच रुग्णांनाही आपला कोपर दुखतोय म्हणजे आपणास  टेनिस एल्बो असणार हे डॉक्टरांना भेटायच्या आधीच माहित असते . 
संगणक,मोबाईलचा अतिवापर आणि व्यायामाचा अभाव हे त्रासाचे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण आहे. टेनिस ,गोल्फ ,बॅडमिंटन खेळणाऱ्या खेळाडूमध्ये सरासरी  ५० % पेक्षा जास्त खेळाडूंना या त्रासाला सामोरे जावे लागते. 

 टेनिस एल्बो -- गोल्फर्स एल्बो म्हणजे काय ? व लक्षणे कोणती  ?

  • सततची कोपरदुखी (Chronic)असे त्यास थोडक्यात संबोधता येईल . 
  • टेनिस एल्बो प्रकारात कोपराच्या बाहेरील भागात (Lateral epicondyl) सतत कळ मारते. 
  • कोपरातून हात सरळ केल्यावर कळीचे प्रमाण वाढते. 
  • स्क्रू आवळण्याची क्रिया किंवा हात पिळकटण्याची क्रिया (Twisting) केल्यानंतर त्रास वाढतो. 
  • एखादी वस्तू हातात घट्ट पकडतांना ती वस्तू हातातून पडते. 
  • मनगटातून हात वर उचलतांना (Dorsiflex) सुद्धा वेदना होतात. 
गोल्फर्स एल्बो या  प्रकारात  टेनिस एल्बोच्या बरोबर विरुद्ध म्हणजे कोपराच्या आतील बाजूस सतत कळ मारते.(Medial Epicondyl)
  1. कोपर आत दुमडल्यानंतर (Flexor Group)किंवा Twist केल्यानंतर कोपराच्या आतील भागास वेदना होतात. (स्क्रू आवळण्याची क्रिया)
  2. खालील रुग्णांमध्ये कोपरदुखीचे प्रमाण अधिक आढळते
  • खेळाडू / वजन उचलण्याचा व्यायाम करणाऱ्यांमध्ये
  • घरकाम करणारी महिला
  • सुतार काम /इलेक्ट्रिशियन व्यवसाय करणाऱ्यांमध्ये /प्लंबर
  • संगणक वापर करणाऱ्यांमध्ये /शासकीय कर्मचारी
  • व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींमध्ये /सुर्यप्रकाशात न जाणाऱ्या व्यक्तींमध्ये ('ड 'जीवनसत्वाची कमतरता )
  • रक्तातील युरिक ऍसिड (Serum Uric Acid)प्रमाण वाढल्यामुळे
  • डायबेटिसच्या रुग्णांमध्ये (डायबेटिक टेन्टीनायटिस) 
कारणे
  • कोपराच्या बाहेरील भागात (Lateral Epicondyl) मनगट उचलणे ,स्नायू (Extensor Group) व  स्क्रू ड्रायव्हिंगची हालचाल करणारे (Supinator) स्नायू चिकटलेले असतात. हे स्नायू फाटल्यामुळे किंवा उचकटल्यामुळे  टेनिस एल्बोचा त्रास होतो / किंवा स्नायू झिजल्यामुळे सुद्धा हा त्रास होतो.(Tendanopathies-Prog.Degeneration)
  • खेळाडूंमध्ये सततचा त्या स्नायूंवरील ताण 
  • महिलांमध्ये एखादी वस्तू उदा. पाणी भरलेली भांडी चुकीच्या पद्धतीने किंवा बेसावधपणे उचलल्यामुळे किंवा व्यायामाची सवय नसणाऱ्या व्यक्तीने त्या स्नायूस अचानक ताण दिल्यामुळे तो ताण नसलेला फटीग स्नायू फाटतो. 
  • गॉल्फर्स एल्बोमध्ये बरोबर विरुद्ध बाजूस म्हणजे कोपराच्या आतील भागात कोपर दुमडणारे(Flexor Group)आणि(Twisting) पिळकटण्याची हालचाल करणारे स्नायू (Pronaors)चिकटलेले असतात. वरील स्नायू फाटल्यास किंवा उचकटल्यास गॉल्फर्स एल्बोचा त्रास होतो. 
  • टेनिस एल्बो/गॉल्फर्स एल्बो ही नावे त्याच्या खेळातील खेळाडूंमध्ये या त्रासाचे प्रमाण अधिक असल्यामुळे पडले आहे. 
  • स्नायूंच्या झिजेचा त्रास असणाऱ्या म्हणजे कोल्याजिन डिजनरेशनचा (Collagenous Degeneration) त्रास असणाऱ्या रुग्णात खांद्याच्या टेंडिनायटिस (Shoulder Tendinitis)आणि पाठीच्या स्नायूंचा दाह (Fibrositis of Back)बरोबर  टेनिस एल्बो व  गॉल्फर्स एल्बोचाही त्रास निदर्शनास येतो. 

तपासणी

१) X-RAY:-  X-ray तपासणी बहुतांश निगेटिव्ह किंवा दोषविरहित असते.
पण काही पेशंटमध्ये हाडाचा तुकडा स्नायूबरोबर उचकटत असल्यास तसे X-ray वर दिसू शकते.
२) रक्त चाचणी :- सिरम युरिक ऍसिड,Vit D व रक्तातील साखरेचे प्रमाण (डॉक्टरांनी सल्ला दिल्यास तपासणी आवश्यक )

उपचार 

१) कोपरास तीन आठवडे विश्रांती देणे.
  •  Elbow Strap एल्बो स्ट्रॅपचा  वापर करुन स्नायूंना विश्रांती देता येते. 
  • त्रास अधिक असल्यास उदा. खेळाडू किंवा वजन उचलण्याचा व्यायाम करणाऱ्यांमध्ये कच्चे प्लास्टर लावावे लागते. ते दिवसातून एकदा काढून कोपरास हलका मसाज द्यावा लागतो. 
  • वजन उचलणे /भांडी घासणे /झाडू मारणे /कपडे पिळणे काही काळ थांबवावे. 

२) डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक गोळ्या किंवा स्नायूंची झिज थांबवणाऱ्या गोळ्या घ्याव्यात. (Progressive Degeneration)

३) केनाकॉर्ट इंजेक्शन :-
दुखणाऱ्या भागामध्ये  इंजेक्शन देता येते पण शक्यतो टाळावे. एक किंवा फार फार तर दोन  इंजेक्शन १५ दिवसांच्या अंतरावर अगदी आवश्यकता वाटल्यास देता येते.

४) ऑपरेशन :-

टेनिस एल्बो / गोल्फर्स एल्बोच्या रुग्णास फार कमी वेळेस ऑपरेशन लागू शकते. उदा. अति तीव्र त्रास असणारे खेळाडू.

५) कोपरास विश्रांती देत असताना दिवसातून किमान तीन वेळेस कोपरास एखादे मलम /जेल लावून तळहाताने हलका मसाज द्यावा /थोडं शेकून मसाज दिल्यास अति उत्तम. शक्य झाल्यास नजीकच्या अस्थिरोगतज्ञ डॉक्टरांकडे जाऊन अल्ट्रासाऊंड थेरपी (USG)सलग १५ दिवस घ्यावी.

६) व्यायाम :-

  • कोपरातून सांधा सरळ ठेऊन मनगट वर (Dorsiflex) व खाली (Plantarflex)खेचणे.


  • हातात लहान पाण्याने भरलेली बॉटल घेऊन कोपरातून सांधा दुमडणे (Flex) व सरळ करणे.(Extend) 

  • हातात लहान हातोडा घेऊन व न घेता स्क्रूड्रायव्हर वापरासारखा व्यायाम करणे. 

  • दोन्ही हातात रॉड / काठी पकडून कोपरातून सांधा सरळ ठेऊन फिरवणे. 

  • पाण्याची लहान बॉटल हातात घेऊन मनगटाचे व्यायाम करणे. 

  • मऊ स्पंजबॉल घेऊन दाबणे व सैल सोडणे. 


७) सततची कोपरदुखी टाळण्यासाठी त्रास सुरु झाल्यावर ताबडतोब योग्य निदान तसेच विश्रांती स्ट्रेचिंगचे व्यायाम फार महत्त्वाचे आहे. अन्यथा किरकोळ वाटणारी कोपरदुखी क्रोणिक होऊन जाते. उपचार घेऊन देखील फरक पडत नाही. काही वेळेस ऑपरेशन सुद्धा लागू शकते. आवश्यकता आहे ती योग्य दक्षतेची.

८) नियमित व्यायाम,सुर्यप्रकाशात काही वेळ घालवणे.या सारखा उत्तम प्रतिबंधात्मक इलाज नाही.

                                                                                                                   


डॉ.संजय कामत 
अस्थिरोगतज्ञ 
प्रमुख कामत हॉस्पिटल ,पुणे. 
९८२२४३७८८२/७२७६७२२२२९












Comments

  1. As usual very well explained Dr Kamat Sir .I really appreciate your efforts you take to make community aware of these modern lifestyle disorders .You are one of those Doctors who has understood their responsibility of not only treating patients but making them aware and giving them best understanding with preventative measures .
    Keep writing Sir !!!!

    ReplyDelete
  2. Excellent information, based on detailed observation and analysis.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

VitB12 / B6 / फॉलिक ऍसिड गुणकारी जीवनसत्त्व

Vit D 'ड' जीवनसत्व गुणकारी जीवनसत्व