Vit D 'ड' जीवनसत्व गुणकारी जीवनसत्व

                

                     "ड" जीवनसत्व (Vitamin-D) गुणकारी जीवनसत्व 


'ड' जीवनसत्व (Vitamin D) हे अगदी सहज उपलब्ध होणारे अतिमहत्त्वाचे जीवनसत्व आहे.त्यास सनशाईन (Sunshine) व्हिटॅमिन असेही संबोधले जाते . 'ड' जीवनसत्व कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे शरीरातील प्रमाण योग्य ठेवण्याचे महत्त्वाचे काम करते. 

सुर्यप्रकाश किरणांमधील अल्ट्राव्हॉयलेट 'ब'(UVB) किरणे त्वचेवर पडल्यानंतर त्वचेच्या बाहेरील आवरणात (Epidermis) नैसर्गिक रित्या असलेली क्रियाहीन Vit D2 (7-Dehydrocholesterol) चे क्रियाशील Vit D3 (Cholecalciferol) मध्ये रूपांतर होते . या VIT D3 चे किडनी आणि लिव्हर च्या मदतीने हायड्रोक्सीलेशन होऊन १,२५ डायहायड्रोक्सी Vit D मध्ये रूपांतर होते.

आहारातुन आलेल्या 'ड' जीवनसत्वाचे अशाच प्रकारे किडनी आणि लिव्हर च्या मदतीने हायड्रोक्सीलेशन होऊन १,२५  डायहायड्रोक्सी  Vit D मध्ये रूपांतर होते. 

हे हायड्रॉक्सिलेटेड Vit D3 आहारातील कॅल्शिअम आणि फॉस्फरस--छोट्या आतड्यातुन (Small Intestine)शोषुन घेते व त्यास रक्तामध्ये जाण्यास मदत करते .
या Vit D3 मुळे शरीरातील  कॅल्शिअमचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत होते . आहारातील कॅल्शिअम शोषून घेऊन रक्ताद्वारे हाडे आणि मांस पेशींपर्यंत पोहचवण्याचा 'ड' जीवनसत्व हा महत्त्वाचा घटक आहे. 

    

पण कोणत्याही सहज अथवा फुकट उपलब्ध होणाऱ्या वस्तूचे आपणास मोल वाटत नाही. भारत हा विषुववृत्तीय देश आहे. मुबलक सुर्यप्रकाश असुन देखील आपल्या देशात 'ड' जीवनसत्वाच्या (Vit D) कमतरतेचे  प्रमाण  ७० ते १०० % आहे . ही विचार करायला लावणारी बाब आहे . 

'ड' जीवनसत्वाच्या (Vit D) कमतरतेची प्रमुख कारणे :--

१)  'ड' जीवनसत्वाच्या (Vit D) कमतरतेमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती नसणे--

'ड' जीवनसत्वाच्या (Vit D) कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये मुडदूस (Rickets) होतो व प्रौढ लोकांमध्ये हाडे मऊ अथवा कमकुवत होतात, ज्याला आपण प्रौढ लोकांचा मुडदूस  ( Adult Rickets)अथवा ऑस्टिओमलेशिया (Osteomalacia) म्हणतात, याची सर्वाना कल्पना आहे . पण  मधुमेह (Type II Diabetis),रोगप्रतिकारशक्ती कमी होणे,कॅन्सर,आकलनशक्ती कमी होणे (Cognitive Impairment), मानसिक संतुलन ढासळणे (Depression),केस गळणे हे देखील 'ड' जीवनसत्वाच्या (Vit D) कमतरतेमुळे होऊ शकते .  

२) सुर्यप्रकाशात न जाणे :-- 

अनियमित कामाच्या वेळा,सतत टी .व्ही बघणे ,कॉम्प्युटर ,मोबाईल या आधुनिक साधनांमुळे बरेच लोक बाहेर फिरणे टाळतात. ते एक व्यसन होऊन बसले आहे . सकाळी १० ते दुपारी २ या दरम्यानचाच सुर्यप्रकाश उपयुक्त असतो,ज्यात अल्ट्राव्हॉयलेट 'ब' किरणे (UVB Rays) जास्त असतात.पण साधारणतः याच वेळेस बरेच लोक ऑफिस मध्ये असतात. रात्रपाळी करणारे कंटाळा आल्यामुळे बाहेर जायचे टाळतात आणि गृहिणी किचनमध्ये व्यस्त असतात. सुर्यप्रकाशात न गेल्यामुळे Vit D ची कमतरता निर्माण होते . 


 ३) आहारामध्ये ड जीवनसत्वाची कमतरता :--

मासे,माशापासून बनवलेले तेल,अंडी (पिवळा भाग ),बिफ लिव्हर या मध्ये ड जीवनसत्व आढळते. पण शाकाहारी लोकांना याच्या कमतरतेमुळे समस्या निर्माण होते. Vit D युक्त धान्य ,कडधान्य व डेअरी प्रॉडक्ट्स सर्वांनाच उपलब्ध होत नाहीत . 

४) कातडीचा रंग :--

काळ्या रंगाच्या त्वचेमध्ये मेलॅनिन (Melanin) चे प्रमाण अधिक असल्याने UVB किरणे कमी प्रमाणात शोषली जातात. 


५) संपुर्ण शरीर झाकणारे कपडे वापरल्यामुळे:--

काही धार्मिक कारणास्तव संपुर्ण शरीर झाकणारे  कपडे वापरले जातात. परिणामी सुर्यकिरणे त्वचेपर्यंत पोहचत नाहीत.

६) कोणत्या वेळी सुर्यप्रकाशात जावे ही माहिती नसल्यामुळे :-- 

बहुतांश लोकांना नक्की कोणत्या वेळी सुर्यप्रकाशात जावे,याचीच कल्पना नसते. 'ड' जीवनसत्वासाठी (Vit D) लागणारी अल्ट्राव्हॉयलेट किरणे (UVB) सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत असतात. तोच कालावधी योग्य. सर्वसाधारणपणे २० ते ३० मिनिटे सुर्यप्रकाशात जाणे आवश्यक आहे.सुर्यप्रकाश पाठीवर घेता आला तर अतिउत्तम. आपल्या उंचीपेक्षा जेवढी सावली लहान तेवढे किरण जास्त मिळतील.तीच वेळ योग्य. 

७) दुधाची ॲॅलर्जी, सुर्यप्रकाशाची ॲॅलर्जी,आणि संपुर्ण शाकाहारी लोकांमध्ये (Vit D) ड जीवनसत्वाची कमतरता अधिक आढळते .


८) किडनी रोग असणारे :--

Vit D3 चे हायड्रॉक्सिलेशन किडनी मध्ये होते आणि 1,25 Dihydroxy Vit D (1,25 डायहायड्रोक्सी Vit D) तयार होते.जे कॅल्शिअम ट्रान्सपोर्टमध्ये अत्यंत महत्त्वाची भुमिका बजावते.किडनीचा रोग असणाऱ्यांमध्ये ही प्रक्रिया होत नसल्याने (Vit D) 'ड' जीवनसत्वाची कमतरता निर्माण होते. 

९) सनस्क्रीन लोशन (Sunscreen Lotion) वापरल्यामुळे:--

सनस्क्रीन लोशन वापरामुळे UVB किरणांचा शोषणास अडथळा निर्माण होतो.


१०)  प्रदुषण आणि (Vit D)ड जीवनसत्वाची कमतरता :--

प्रदुषणामुळे UVB किरणे पृथ्वीपर्यंत पोहचण्यास फार  मोठा अडथळा निर्माण होतो. UVB किरणांच्या कमतरतेमुळे ड जीवनसत्व (Vit D) निर्माण होत नाही. 


११) पोटाचे विकार :--

काही पोटांच्या विकारामुळे उदा. क्रोन्स डिसीज (Chron's Disease),सिलियाक डिसीज (Celiac Disease),सिस्टिक फायब्रोसिस (Cystic Fibrosis) मध्ये ड जीवनसत्व  (Vit D)आतड्यात शोषुन घेतले जात नाही. 

१२) लठ्ठपणा :--

चरबीच्या पेशी (fat Cells) रक्तातील (Vit D) ड जीवनसत्व शोषुन घेतात त्यामुळे  (Vit D) ड जीवनसत्वाची कमतरता निर्माण होते. BMI > ३० पेक्षा जास्त असल्यास कमतरता अधिक निर्माण होते. 

लक्षणे :--

'ड'जीवनसत्वाच्या कमतरतेमध्येच खालील नमूद लक्षणे दिसून येतात असे नाही.पण बऱ्याच आजारांमध्ये 'ड'जीवनसत्वाची कमतरता मात्र आढळून येते. 
  • लवकर थकून जाणे.(Fatigue)
  • स्नायू दुखणे,हाडे दुखणे आणि अशक्तपणा (General Muscle & Bone Pain Weakness)
  • हाता पायांना गोळे येणे.(Muscle Cramp) 
  • सांधे दुखी,मानदुखी,पोटदुखी . 
  • झोप नीट न लागणे (Restless Sleep) 
  • वजन वाढणे 
  • उच्च रक्तदाब 
  • संडास लघवीच्या तक्रारी 
  • सतत जंतुचा प्रादुर्भाव ,सर्दी ,खोकला,श्वसनक्रियेचे आजार (COPD)


'ड' जीवनसत्वाच्या (Vit D) कमतरतेचे दुष्परिणाम :--






  • कमजोर अथवा मऊ हाडे (Osteomalacia) आणि दीर्घकाळ 'ड' जीवनसत्वाच्या (Vit D) कमतरतेमुळे निर्माण होणारा हाडांचा ठिसूळपणा(Osteoporosis)
  • लवकर थकुन जाणे (Fatigue)
  • Type II डायबेटीस
  • रोगप्रतिकार शक्ती (Immunity) कमी होते
  • केस गळणे (Alopecia)
  • आकलनशक्ती कमी होते (Cognitive Impairment)
  • मानसिक संतुलन (Depression) ढासळणे
  • लहान मुलांमध्ये मुडदूस(Rickets) आणि बाल दमा (Child Asthama)
  • कॅन्सर


१) कमजोर अथवा मऊ हाडे (Osteomalacia) आणि दीर्घकाळ 'ड' जीवनसत्वाच्या (Vit D) कमतरतेमुळे निर्माण होणार हाडांचा ठिसूळपणा(Osteoporosis)

आहारामधून आलेले कॅल्शिअम व फॉस्फरस छोट्या आतड्यातून(Ileum part of small intestine) शोषून घेऊन रक्ताद्वारे हाडांपर्यंत पोहचवण्याचे काम 'ड' जीवनसत्व (Vit D) करते . 'ड' जीवनसत्वाच्या (Vit D) कमतरतेमुळे ही प्रक्रिया मंदावते. परिणामी हाडे मऊ होतात ज्याला आपण (Osteomalacia)ऑस्टिओमलेशिया असे म्हणतो. वारंवार अंग दुखणे,पाठ दुखणे,मान दुखणे,हाडे दुखणे ह्या तक्रारी सुरु होतात.लवकर उपचार न केल्यास हाडे ठिसूळही होतात,ज्यास आपण ऑस्टिओपोरोसिस(Osteoporosis) असे म्हणतो. प्रत्येक तीन स्त्रियांमागे एका भारतीय स्त्रीस आणि प्रत्येक आठ पुरुषांमागे एका भारतीय पुरुषास हाडांचा ठिसूळपणा आहे.International Osteoporosis Foundation Fact Sheet नुसार ३०० मिलियन (३० कोटी ) लोकांना हाडाचा ठिसूळपणा आहे.
हाडांच्या ठिसूळपणाचे खास वैशिष्ट्य असे की ठिसूळपणा असणाऱ्या व्यक्तीचे तीन ठिकाणची हाडे मोडण्याची भीती असते .
  1. मणका दबून होणारे फ्रॅक्चर
  2. खुब्याचे हाड मोडणे
  3. मनगटातील हाड मोडणे
वयाच्या ६० वर्षानंतर हि हाडे मोडण्याचे प्रमाण ६० ते ७० % आहे.हाडाच्या ठिसूळपणाची इतर बरीच कारणे आहेत त्यापैकी दीर्घकालीन (Vit D) 'ड' जीवनसत्वाची कमतरता हे एक आहे.





२) लवकर थकून जाणे (Fatigue) :--घरी काम करणाऱ्या गृहिणींपासून ते  ऑफिस कर्मचाऱ्यांपर्यंत  बऱ्याच लोकांची एकाच तक्रार --काम करतांना थकल्यासारखे वाटते,उत्साह वाटत नाही,लवकर दमून जातो/जाते. कारणे बरीच आहेत,पण  Vit D 'ड' जीवनसत्वाची कमतरता हे एक दुर्लक्षित राहिलेले पण महत्त्वाचे कारण आहे. प्रत्येक स्नायूला कॅल्शिअमच्या स्वरूपात ऊर्जा लागते. ही ऊर्जा कमी पडल्यामुळे तो स्नायू थकून जातो (Fatigue) फटीग होतो आणि दुखू लागतो. फटीग स्नायू सहज जखमी देखील होतो.

३) Type II डायबेटीस
स्वादुपिंड (Pancreas) इन्सुलिन तयार करून शरीरात साखरेचेप्रमाण मर्यादित ठेवते. स्वादुपिंडातील बिटा पेशी हे कार्य करते. 'ड' जीवनसत्वामुळे इन्स्युलिनला प्रतिसाद देण्याची संवेदन क्षमता वाढते. तसेच स्वादुपिंडातील बिटा पेशींचे कार्य सुधारते. परिणामी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. दीर्घकालीन 'ड' जीवनसत्वाची कमतरता असणाऱ्यास Type II टाईप टू डायबेटीस (मधुमेह) होण्याची शक्यता जास्त असते.

४) रोगप्रतिकारशक्ती कमी होते :-- 'ड' जीवनसत्व रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. 'ड' जीवनसत्व कमी पडल्यास जंतुंचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण वाढते. सर्दी,खोकला,न्युमोनिया,सि.ओ.पी.डी (COPD)च्या रुग्णांमध्ये 'ड' जीवनसत्वाचे प्रमाण कमी आढळते. 

५) केस गळणे ॲॅलोपेशिया (Alopecia) :-- 'ड' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. काही वेळेस अति केस गेल्यामुळे काही भागात टक्कल पडल्यासारखे (Spot Baldness) सुद्धा होते.(Vit D) 'ड' जीवनसत्व केसांच्या फॉलिकल च्या निर्मितीत (Creat New Hair Follicle)मदत करते.




६) आकलनशक्ती कमी होणे (Cognitive Impairment) मानसिक संतुलन ढासळणे हृदयविकार :-- वयस्कर लोकांमध्ये त्वचे मधील 'ड' जीवनसत्वाचे (7dehydrocholesterol) प्रमाण कमी होते, तसेच सूर्यप्रकाशात जाणेही कमी होते,पोटाच्या व्याधीही वाढतात. परिणामी 'ड' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वरील आजार जास्त प्रमाणात आढळतात.

७)लहान मुलांमध्ये मुडदूस (Rickets) आणि बालदमा (Vit D) 'ड' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो.

८) कॅन्सर :-- 'ड' जीवनसत्व कॅन्सर पेशींच्या वाढीस आळा घालतो.बळावलेल्या कॅन्सर रुग्णांत 'ड' जीवनसत्वाचे खूप कमी प्रमाण आढळते.

निदान :--

'ड' जीवनसत्व चाचणी

१) Serum Vit D रक्त चाचणी
  • योग्य प्रमाण :-30--100 ng/ml
  • Deficiency < 20 ng/ml
  • Insufficiency 20-30 ng/ml
  • Potential Toxicity > 100 ng/ml

उपचार :--

१) डॉक्टरांच्या सल्ल्याने 'ड' जीवनसत्वाच्या गोळ्या अथवा पातळ औषध घ्यावे. गरज भासल्यास 'ड'जीवनसत्वाचे इंजेक्शनही उपलब्ध असतात.

२) आहार -
  • फिश (Fatty Fish)
  • फिश लिव्हर ऑइल                                                                         
  • ड जीवनसत्वयुक्त (Fortified) डेअरी प्रॉडक्ट्स                                           
  • ड जीवनसत्वयुक्त (Fortified) धान्य /कडधान्य
  • बिफ लिव्हर
  • अंडे (पिवळा भाग)

'ड' जीवनसत्वाच्या शोषणासाठी मॅग्नेशियमयुक्त आहार गरजेचा आहे.


3) मॅग्नेशियमयुक्त आहार
  • हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या --पालक,ब्रोकोली,कोबी
  • फळे --अंजीर/केळी/रासबेरी
  • बिया --बदाम/जवस
  • कडधान्ये --राजमा /पावटा/उडीद
  • सी फुड --समुद्री मासे --ट्युना /साल्मेन

नियमित सकाळी १० ते दुपारी २ च्या दरम्यानच्या सूर्यप्रकाशात किमान २० ते ३० मिनिट जावे.

'ड' जीवनसत्वाच्या कमतरतेवर आपण सहज मात करु शकतो गरज आहे ती इच्छाशक्तीची.

प्रत्येक सजीवास सूर्यप्रकाशाची गरज असते. जिवंतपणे निर्जीव वस्तुसारखे जगण्यात काहीच अर्थ नाही.



दररोज चाला --सुर्यप्रकाशात जा --उत्तम आहार घ्या --निरोगी जीवन जगा




















डॉ. संजय कामत 
अस्थिरोगतज्ञ 
प्रमुख कामत हॉस्पिटल,पुणे.
 ९८२२४३७८८२ / ७२७६७२२२२९














Comments

  1. Very useful information Sir thank you so much

    ReplyDelete
  2. Much informative and simple to understand. Thanks Dr. Kamat Sir for your efforts for lay community

    ReplyDelete
  3. Very useful information... thank you sir

    ReplyDelete
  4. It really good knowledge for me , thanks Dr

    ReplyDelete
  5. Sir realy very nice information.

    ReplyDelete
  6. Nice and useful information for living healthy lifestyle

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कोपरदुखी/टेनिस एल्बो/गोल्फर्स एल्बो

VitB12 / B6 / फॉलिक ऍसिड गुणकारी जीवनसत्त्व