कोपरदुखी/टेनिस एल्बो/गोल्फर्स एल्बो
कोपरदुखी / टेनिस एल्बो / गोल्फर्स एल्बो ( Epicondylar Tendinopathies) टेनिस एल्बो म्हटलं की सचिन तेंडुलकर या क्रिकेटपटूची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. टेनिस एल्बोमुळे त्याच्या क्रिकेट कारकीर्दीस धोका निर्माण झाला होता. शेवटी उपचारासाठी त्याला परदेशी जावे लागले. बऱ्याच रुग्णांनाही आपला कोपर दुखतोय म्हणजे आपणास टेनिस एल्बो असणार हे डॉक्टरांना भेटायच्या आधीच माहित असते . संगणक,मोबाईलचा अतिवापर आणि व्यायामाचा अभाव हे त्रासाचे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण आहे. टेनिस ,गोल्फ ,बॅडमिंटन खेळणाऱ्या खेळाडूमध्ये सरासरी ५० % पेक्षा जास्त खेळाडूंना या त्रासाला सामोरे जावे लागते. टेनिस एल्बो -- गोल्फर्स एल्बो म्हणजे काय ? व लक्षणे कोणती ? सततची कोपरदुखी (Chronic)असे त्यास थोडक्यात संबोधता येईल . टेनिस एल्बो प्रकारात कोपराच्या बाहेरील भागात (Lateral epicondyl) सतत कळ मारते. कोपरातून हात सरळ केल्यावर कळीचे प्रमाण वाढते. स्क्रू आवळण्याची क्रिया किंवा हात पिळकटण्याची क्रिया (Twisting) केल्यानंत...