Vit D 'ड' जीवनसत्व गुणकारी जीवनसत्व
"ड" जीवनसत्व (Vitamin-D) गुणकारी जीवनसत्व 'ड' जीवनसत्व (Vitamin D) हे अगदी सहज उपलब्ध होणारे अतिमहत्त्वाचे जीवनसत्व आहे.त्यास सनशाईन (Sunshine) व्हिटॅमिन असेही संबोधले जाते . 'ड' जीवनसत्व कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे शरीरातील प्रमाण योग्य ठेवण्याचे महत्त्वाचे काम करते. सुर्यप्रकाश किरणांमधील अल्ट्राव्हॉयलेट 'ब'(UVB) किरणे त्वचेवर पडल्यानंतर त्वचेच्या बाहेरील आवरणात (Epidermis) नैसर्गिक रित्या असलेली क्रियाहीन Vit D2 (7-Dehydrocholesterol) चे क्रियाशील Vit D3 (Cholecalciferol) मध्ये रूपांतर होते . या VIT D3 चे किडनी आणि लिव्हर च्या मदतीने हायड्रोक्सीलेशन होऊन १,२५ डायहायड्रोक्सी Vit D मध्ये रूपांतर होते. आहारातुन आलेल्या 'ड' जीवनसत्वाचे अशाच प्रकारे किडनी आणि लिव्हर च्या मदतीने हायड्रोक्सीलेशन होऊन १,२५ डायहायड्रोक्सी Vit D मध्ये रूपांतर होते. हे हायड्रॉक्सिलेटेड Vit D3 आहारातील कॅल्श...