VitB12 / B6 / फॉलिक ऍसिड गुणकारी जीवनसत्त्व
Vit B12 /B6/ Folic Acid गुणकारी जीवनसत्व Vit B12 ( मिथील कोबालामाईन ) ,Vit B6 (पायरिडॉक्सिन ), Folic Acid(फोलिक आम्ल ) ही अतिशय महत्त्वाची जीवनसत्वे आहेत . अगदी हृदयाजवळची म्हणायला हरकत नाही . कारण यांच्या कमतरतेचा परिणाम सरळ हृदय -रक्तवाहिण्या -मेंदु व संवेदना वाहणाऱ्या नसा आणि हाडांवर होत असतो . तो कसा ते आपण आता पाहू . . . Vit B12 हे अतिशय महत्त्वाचे व्हिटॅमिन आहे . त्यातील कोबाल्ट या धातूमुळे त्यास कोबालामाईन असेही संबोधले जाते . आपल्या शरीरात खालील कारणांसाठी Vit B12/Vit B6/Folic Acid ची गरज असते . मायलिन शीथ (Nerve Sheet) नसावरील आवरण तयार करण्यासाठी नसेमधील पेशी (Nerve Cell)तयार करण्यासाठी रक्तामधील पेशी (RBC)तयार करण्यासाठी DNA तयार करण्यासाठी रक्तातील होमोसिस्टीन चे प्रमाण Vit B6 आणि Folic Acid च्या मदतीने कमी करण्यासाठी हाडे तयार करण्यासाठी /हाडांच्या मजबुतीसाठी न्युरोट्रान्समिटर (मेंदुतील केमिकल...